LCB Chandrapur: चंद्रपूरमध्ये तलवारीने दहशत निर्माण करणाऱ्याला अटक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात तलवारी घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विक्रमसिंग सबजीतसिंग टाक (वय २१, रा. जुनोना चौक, बाबुपेठ, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक काल, २५ जून २०२५ रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, महाकाली मंदिर जवळील हनी बार अँड रेस्टॉरंट समोर विक्रमसिंग टाक हातात तलवार घेऊन लोकांना घाबरवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला शिताफीने पकडले.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ४३९/२०२५, कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजीनकांत पुटटेवार, पोलीस अंमलदार प्रशांत नागोसे, इमरान खान, किशोर, सुमित बरडे, आणि शेखर माथनकर यांचा समावेश होता.