Chandrapur Accident News: बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

Bhairav Diwase
जनता कॉलेज चौकातील सिग्नल वरील घटना
चंद्रपूर:- बस च्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकातील सिग्नल वर घडली. बस चंद्रपूर वरून घुग्गूस कडे जात असताना अचानक सायकल स्वाराचा तोल गेल्याने तो बस खाली गेला आणि तो जागीच ठार झाल्याची घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतक सायकल स्वाराचा अद्याप नाव कडू शकले नाही. रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा या घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसा पासून जनता कॉलेज चौकातील सिग्नल परिसरात अनेक अपघात होत आहेत. वाहतूक पोलिसासह प्रशासनं दुर्लक्ष करीत आहेत.