चंद्रपूर:- चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य पदयात्रा काढली.
'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शिस्तबद्ध रांगेत चालत या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या विचारांचा जागर केला. पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर, तिथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी मानाचा मुजरा केला.
या सोहळ्यात महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शिवरायांचा वारसा आणि आदर्श जपण्याचा संकल्प करत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.



