चंद्रपूर:- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी 'कॉक्रोज जनता पार्टी' (CJP) च्या वतीने येत्या १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची धास्ती घेत चंद्रपूर पोलिसांनी CJP च्या सदस्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. Delhi Protest Notice
पोलिसांनी मयूर माळखेडे आणि राज बडोले या CJP च्या प्रमुख सदस्यांना ही नोटीस दिली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे नेमके कारण, उद्देश तसेच या संपूर्ण आंदोलनासाठी आर्थिक सहकार्य (फंडिंग) कोण करत आहे, याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती मागितली आहे. Chandrapur
काय आहेत पोलिसांच्या सूचना?
नवी दिल्लीतील आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचना.
विनापरवानगी कोणत्याही आंदोलनात सहभागी न होणे.
हिंसक कृत्यांना प्रोत्साहन न देणे आणि भडकाऊ भाषणे टाळणे.
सोशल मीडियावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या किंवा हिंसाचारास प्रवृत्त करणाऱ्या पोस्ट शेअर न करणे.
पोलिसांनी बजावलेल्या कायदेशीर सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे नोटीसीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच, सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७ अंतर्गत निर्बंध लागू असल्याचे पोलिसांनी आठवण करून दिली आहे. Chandrapur police
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, परिस्थितीनुसार कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही चंद्रपूर पोलिसांकडून देण्यात आला आहे. CJP Delhi Protest
