मुल:- मूल-चंद्रपूर मार्गावरील आकापूर येथील धोकादायक वळणावर मध्यरात्री एक अपघात घडला आहे. अनियंत्रित दुचाकी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॅरिकेटवर आदळल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूल-चंद्रपूर मार्गावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक दुचाकी जात होती. आकापूर येथील वळणावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट रस्त्यावरील बॅरिकेटवर जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतकाची नावे अद्यापही कळू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत. आकापूर येथील या वळणावर वारंवार अपघात होत असल्याने वाहन चालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

