Accident News: बसस्थानकासमोर अपघात; बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू

Bhairav Diwase

मुल:-
मूल बसस्थानकासमोर झालेल्या एका अपघातात महामंडळाच्या बसखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास मूल बसस्थानक परिसरात हा अपघात घडला. शालूबाई पचारे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.


सकाळच्या सुमारास ही महिला बसस्थानकासमोर झोपून असताना, महामंडळाच्या (एसटी) बसचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने हा भीषण अपघात झाला. दुर्दैवाने या घटनेत शालूबाई यांचा जागीच मृत्यू झाला.


घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.