Top News

वातावरण निर्मीतीसाठी "उचलली जीभ लावली टाळुला!" #Chandrapur #chandrapurloksabha

Photo Source:- Google 

चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचाराची धुरा चंद्रपूर ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सुभाष धोटे यांनी सांभाळली आहे. शिवाणी वडेट्टीवार यांच्या लोकसभा उमेदवारीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये बऱ्याच खटपटी झाल्यानंतर वरिष्ठ कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी आम. प्रतिभा धानोरकर यांना शेवटच्या क्षणाला उमेदवारी देऊ केली. त्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आम. विजय वडेट्टीवार व त्यांच्या समर्थकांची नाराजी ओढवून घेतली.


प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर प्रतिभा धानोरकर उमेदवारी अर्ज दाखल करेपावेतो विजय वडेट्टीवार व त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकडे पाठ फिरवली. वडेट्टीवार यांच्या समर्थकांना समजूत काढण्यात धोटे यांना बरीच कसरत करावी लागली‌ पक्षांतर्गत वादाचा फटका उमेदवाराला बसत असल्याचे दिसताक्षणी व पक्षांतर्गत गुटबाजी चरम सीमेवर असतांनाच सुभाष धोटे यांनी माध्यमांसमोर "अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप" या म्हणीप्रमाणे उतावळेपणा दाखवित कांग्रेस उमेदवार धानोरकर या भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची "डिपाझिट" जप्त करतील, असे हास्यास्पद वक्तव्य करून वातावरण निर्मिती झाल्याचा आव आणला.


विजय वडेट्टीवार गटातील असंतुष्टाचा फटका कांग्रेस उमेदवाराला मोठ्या प्रमाणात बसू शकेल, यांची जाणीव वरिष्ठ कांग्रेसी नेत्यांना असल्यामुळे कांग्रेसी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना वडेट्टीवार यांची मनधरणी करण्याची व त्यांना सन्मान देण्याचा आदेशचं धानोरकर यांना दिला व त्यांची जबाबदारी आम. सुभाष धोटे यांचेकडे देण्यात आली. त्यात धोटे यांना यश मिळाले व शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी इम्पेरियल पॅलेस येथे काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक रमेश चेनिधल्ला, सरचिटणीस मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांचेसोबत विरोधी पक्ष नेते व राज्याचे वजनदार नेते विजय वडेट्टीवार यांना एका मंचावर आणण्यात काँग्रेसचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांना यश मिळाले. या प्रचारसभेत वडेट्टीवार यांनी धानोरकर या आपण असल्यामुळे अवश्य विजयी होतील, आपली कोणतीही नाराजी नाही असे उद्गार काढीत आपल्याला मोठे मंत्रीपद देण्याचे आवाहन देत आपण वजनदार नेते आहोत, याची जाणीव उपस्थितांना व धानोरकर समर्थकांना करून दिली.


या कार्यक्रमात उपस्थित कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वडेट्टीवार यांना मोठे मंत्रीपद देण्याचे आश्वासन तर दिलेच त्यासोबत "उचलली जीभ, लावली टाळूला!" या उक्तीप्रमाणे कांग्रेस उमेदवार १० लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील अश्या केलेल्या भविष्यवाणीची चर्चा आता सुज्ञ कांग्रेसी पदाधिकारी यांच्यामध्ये होत आहे.


एकीकडे जिल्ह्यातील कोणता नेता कधी भाजपमध्ये प्रवेश करेल, कोणाच्या आदेशाने काम करायचे अश्या संभ्रमावस्था कांग्रेस पदाधिकारी असतांना वरिष्ठ नेते पक्षातील मनमुटाव-अस्थरता दुर करण्याकडे लक्ष न देता "हरबऱ्याच्या झाडावर" चढवत आहेत, यांचा फटका कांग्रेस उमेदवाराला बसेल असे राजकीय जाणकार आत्ता बोलू लागले आहेत. जिल्ह्यातील मैदानी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना "कामाला लागा" असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे "आमच्या आदेशाची वाट पहा" असा आदेश देत आहेत. याकडे वरिष्ठांनी सर्वप्रथम लक्ष पुरविण्याचे सोडून उमेदवार विजयी झाला या अविर्भावात "उचलली जीभ लावली टाळूला" ही कृती त्यांचेसाठी घातक आहे, असेही जाणकारांचे मत आहे.

#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने