Click Here...👇👇👇

Offensive comment on Instagram: चंद्रपुरात मोहरमच्या दिनी ‘मातमी जुलूस’; इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- तक्रारदाराने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ६ जुलै २०२५ रोजी त्यांच्या समाजाने आयोजित केलेल्या पारंपारिक ‘मातमी जुलूस’ वर आक्षेपार्ह आणि धार्मिकदृष्ट्या दुखावणाऱ्या टिप्पण्या केल्या.

चंद्रपूरमधील समाजातील लोक गेल्या ५०-६० वर्षांपासून ही ‘मातमी जुलूस’ काढतात, ज्यामध्ये काळे कपडे घालून आणि छातीवर मारुन करबलात शहीद झालेल्या इमाम हुसैन आणि त्यांच्या साथीदारांना श्रद्धांजली वाहिली जाते. यावर्षी देखील ही ‘मातमी जुलूस’ चे नियोजन भवना जवळील इमामवाड्यापासून शांततेत काढण्यात आली आणि रामाळा तलावाजवळ विसर्जित करण्यात आली.

तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ७ जुलै रोजी त्यांच्या पुतण्या आणि समाजातील काही लोकांनी त्यांना कळवले की, या ‘मातमी जुलूस’ चा व्हिडिओ "Official Chandrapur" नावाच्या इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला आहे, ज्यावर pakiza_matching_center नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्याचप्रमाणे jamesmitchel1959 नावाच्या आणखी एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने आक्षेपार्ह टिप्पण्या लिहून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

तक्रारीकर्त्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९, १९६ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. pakiza_matching_center हा इन्स्टाग्राम आयडी चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर jamesmitchel1959 चा शोध सुरू आहे. (वृत्त लिहेपर्यंत)

पोलिसांनी सांगितले की दोन्ही इन्स्टाग्राम अकाउंटशी संबंधित स्क्रीनशॉट पुरावा म्हणून सादर केले आहेत आणि सायबर सेलने तपास प्रक्रिया वेगवान केली आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या जातीय किंवा धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.