Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा धुमाकूळ; गुराख्याची वाघाने केली शिकार

Bhairav Diwase
मुल:- मुल तालुक्यातील मोजा बेलघाटा येथील पितांबर गुलाब सोयाम (वय ३७) यांच्याबाबत घडली. पितांबर हे शनिवारी दुपारी गुरे चराईसाठी जंगलात गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला व वनविभागाला माहिती दिली.


रविवारी गावकरी व वनविभागाच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवली असता, कन्हाळगाव बिट, कक्ष क्रमांक १७६५ येथे वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.