Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिका: शिवसेना (UBT), वंचित आणि अपक्ष नगरसेवक मातोश्रीवर

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बहुजन वंचित आघाडी व अपक्ष नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली.


या भेटीदरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याच्या सत्तासमीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना संपर्कप्रमुख प्रशांत कदम, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.