Chandrapur News: चंद्रपूरच्या महापौरपदी आता ओबीसी महिला चेहरा!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून होते ते म्हणजे 'महापौर कोण होणार?'. या प्रश्नाचे उत्तर आज अखेर मिळाले आहे. मुंबईतील मंत्रालयात आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली. यात ऐतिहासिक गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेसाठी महत्त्वाचे आरक्षण जाहीर झाले आहे.


राज्यातील २९ महापालिकांमध्ये सत्तेचे केंद्र कुणाकडे जाणार, हे आज स्पष्ट झाले. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पार पडलेल्या या सोडत प्रक्रियेत आरक्षण निश्चित करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौरपद 'इतर मागास प्रवर्ग' म्हणजेच ओबीसी (OBC) महिला साठी आरक्षित झाले आहे.

BREAKING - *महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर*
 
1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
2. नवी मुंबई: सर्वसाधारण
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
13. पुणे: सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी