Join BJP: युवा नेतृत्वाचा उद्या भाजपात प्रवेश; प्रलय म्हशाखेत्री भाजपाचा झेंडा हाती घेतील!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कार्यकौश्यल्यावर विश्वास ठेवत उद्या दि. 17 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयात दु.1.30 वाजता पार पडणार आहे.


प्रलय म्हशाखेत्री हे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष असून वक्तृत्व क्षेत्रात त्यांची फार मोठी पकड आहे. ते अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेचे विजेते आहेत,
व अनेक सामाजिक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. प्रलयने नेहमी वक्तृत्वात चंद्रपूर जिल्ह्याच नावं राज्याच्या शिखरावर पोहोचवल आहे.


अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात ते अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन मागील सात वर्षांपासून ते झटत आहे. अखेर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या सोबत शेकडो युवक भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाने आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपला विद्यार्थी नेतृत्वात बळ मिळणार हे नक्की.