Lightning in Chandrapur district: शेतात काम करताना वीज कोसळली

Bhairav Diwase
एकाच कुटुंबातील ५ जणांसह ८ जण जखमी!

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील बरडकीन्ही गावाबाहेर शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ८ जण जखमी झाले असून, यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे.


बरडकीन्ही गावातील शेतकरी जनाबाई मारुती तलमले यांच्या शेतात मिरची लागवडीचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक हवामान बदलून वीज कोसळली. या दुर्घटनेत तलमले कुटुंबातील ५ जणांसह एकूण ८ जण जखमी झाले.

सर्व जखमींना तातडीने आरमोरी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखमींपैकी मनीषा गोकुळदास ठाकरे (वय २२) यांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित ७ जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.