चंद्रपूर:- कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी आज चंद्रपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला धावती भेट दिली. गडचिरोली येथील दोन दिवसांचा दौरा आटोपून परतत असताना, वाटेत त्यांना चंद्रपूरचे अभियांत्रिकी महाविद्यालय नजरेस पडले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट महाविद्यालय गाठले आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी 'सीजेपी'शी (CJP) जुळलेल्या कार्यकर्त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. "केवळ शिक्षित पिढीच देशात खरा बदल घडवून आणू शकते, त्यामुळे आता सुशिक्षितांनी गप्प बसून न राहता गावाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे," असे ठाम आवाहन अभिजित दिपके यांनी यावेळी केले. तसेच, आपला आगामी दौरा लवकरच चंद्रपूरचा असेल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यादरम्यान केली.

