गोंडवाना विद्यापीठाकडून हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील गोंडवाना विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ करण्यात आले आहे . उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंच्या समवेत नुकतीच ऑनलाइन बैठक घेतली . त्यात विद्यार्थ्यांचे हिवाळी-२०२६ च्या परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.


 त्या अनुषंगाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील गोंडवाना विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या हिवाळी - २०२६ च्या दुष्काळ सदृश्य तालुक्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात परीक्षा शुल्क जमा केलेले आहे.


त्या महाविद्यालयांनी त्वरीत सदर शुल्क परत करावे. सदर शुल्क महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे प्राप्त झालेले असल्यास महाविद्यालयातील विद्याथ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठ त्वरीत परत करेल. सदर आदेश दुष्काळ सदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील महाविद्यालयाला लागु राहतील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

संलग्नित महाविद्यालयानी आवश्यक प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी करावी असे गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नविन परशुराम मुंगळे यांनी कळविले आहे.