चंद्रपूर:- सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर च्या युवा व महिला मंचच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. या मंगलमय आणि ऐतिहासिक सोहळ्याचे शानदार उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय जिल्हा न्यायाधीशांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव हा होता. संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय आणि आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'आदर्श पत्रकार पुरस्कार', 'आदर्श कर्मचारी पुरस्कार' आणि 'आदर्श नागरिक पुरस्कार' देऊन मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हा न्यायाधीशांनी सर्वोदय कल्याणकारी संस्थेच्या सामाजिक आणि बहुउद्देशीय कार्याचे विशेष कौतुक केले. समाजात शांतता, बंधुभाव आणि संविधानाचे मूल्य रुजवण्यासाठी युवा आणि महिला मंचाचे हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
'आदर्श पत्रकार पुरस्कार' ने सन्मानित हिमायूँ अली मुख्य संपादक आरटीआई न्यूज, भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क आणि मुबारक शेख, चंद्रपुर 24 मीडिया तसेच ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ ने सन्मानित मधुकर कवडुजी कोटवार व 'आदर्श नागरिक पुरस्कार' ने सन्मानित संतोष जयस्वाल.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या युवा व महिला मंचाच्या सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक आणि कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाला चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिक, बौद्ध बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
