Top News

विनामूल्य मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न #chandrapur



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- मागील 18 वर्षापासून मोतिबिंदु शिबिरची चळवळ सुरु करुन तालुक्यात नव्हे तर चंद्रपुर जिल्यामधे गोर -गरीब जनतेची सेवा या सामाजिक कार्यातुन सुरु आहे. आज पर्यन्त 15 हजार च्या वर मोतिबिंदु आणि पडदा शस्त्रकिर्या करुन यांचा जनतेला लाभ मिळला आहे.

जात, धर्म, पक्ष सोडून सर्व सामान्य, गरीब लोकांना जे पैसेअभावी शस्त्रकिर्या करू शकत नाही. त्या लोकांना सेवा करण्याचा काम 2004 पासून विनामूल्य मोतिबिंदु शिबिरातून सुरु आहे. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करून, जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा माणुन मोतीबिंदु शिबिरातून हजारो रुग्णची सेवा हीच मानवतेचे महान कार्य आहे, असे प्रतिपादन रमाकांत लोधे माजी जि. प. सदस्य, तालुकाध्यक्ष कांग्रेस कमिटी सिंदेवाही यांनी मिनघरी येथे 1 जानेवारी 2023 ला भव्य विनामूल्य मोतिबिंदु डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले.

सदर शिबिरात 640 रूग्णांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आणि रुग्णांची शस्त्रक्रिये करीता150 रुग्णाची निवड करण्यात आली.पहिल्या टप्प्यामधे 43 रुग्णनां सेवाग्राम येथे शस्त्रकिर्या करीता रवाना करण्यात आले. उर्वरीत रूग्णनां तारीख नुसार नेणार आहेत. शिबिराच्या उदघाटन करुण कार्यक्रमाला सुरवात केली.

उद्घाटन प्रसंगी या शिबिराच्या कार्यकर्माचे उदघाटक डॉ. गजानन कोतर्लावार ( सर् ) ज्ञानेश महाविद्यालय नवरगांव ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभांगी आत्राम सरपंच मीनघरी तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने रमाकांत लोधे माजी जि. प. सदस्य चंद्रपुर, तथा तालुकाध्यक्ष कांग्रेस कमिटी सिंदवाही, डॉ:जाधव नेत्र सहायक सिंदेवाही, किशोर गायकवाड उपसरपंच मिनघरी, विमित दहीवले ग्राम पंचायत सदस्य,रूपेश मेश्राम रत्नापुर, उत्तम गुरनुले माजी सरपंच मिनघरी,मस्के सर् ,ज्ञानेश महाविद्यालय नवरगांव,उत्तरा गुरनुले सदस्य ,अनिल गुरनुले अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ मिनघरी,प्रकाश मोहूर्ले अध्यक्ष माळी समाज मिनघरी,वासुदेव दडमल ग्राम पंचायत सदस्य रत्नापुर,नीलकंठ गहाने त. मु. स अध्य्क्ष मिनघरी, सुमनताई गुरनुले,ज्ञानेश्वर भेडांरे अध्यक्ष जोशाबा संगटना मिनघरी, उपस्थित होते.


कार्यक्रमामधे उदघाटक डॉ.गजानन कोतर्लावार सर, ज्ञानेश महाविद्यालय नवरगांव यांनी उपस्थित लोकांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले.आणि रमाकांत लोधे यांचे सामाजिक कार्य जनतेच्या सेवेसाठी आहे.असेच कार्य करीत रहा. या साठी शुभेच्छा दिल्या. त्यांनंतर विमित दहीवले ग्राम पंचायत सदस्य यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व रमाकांत लोधे यांनी मिनघरी गावासाठी लोककल्याणकारी कामे मंजूर करुण आणली यांची माहिती मिनघरी वाशियांना दिली. पत्रकार (सकाळ समूह) यांनीसुधा मार्गदर्शन केले.सरपंच आत्राम यांनी सुधा थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गुरनुले तर प्रस्ताविक रमाकांत लोधे यांनी केले.आणि आभार प्रदर्शन अविनाश गुरनुले यांनी केले. शिबिराच्या उभारणी करिता लायन्स क्लब चंद्रपुर अध्यक्ष विवेक भास्करवार, सचीव सुनील कुलकर्णी , प्रकल्प अधिकारी लायन्स क्लब चंद्रपुर दिनेश बजाज आणि सेवाग्राम नेत्र रुग्णांलयाचे नेत्रतज्ञ डॉ अजहर शेख,नेत्र सहायक डॉ.सचिन ताकसांडे, डॉ. अलिंद मुरके आणि सेवाग्राम येथील त्यांची चमू यांनी सहकार्य केले .सोबतच शिबिराच्या यशस्वीतेकरीता अमित गुरनुले,लिखित गुरनुले,संजय गहाने रत्नापुर, आशीष गुरनुले, कपिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता रत्नापुर, रंजित मेश्राम, विष्णु गुरनुले,प्रणय गुरनुले,टीकाराम कुंभरे,वामन जीवतोड़े, सोमेश गुरनुले, सूरज गुरनुले ,भावेश गुरनुले,गोपाल गुरनुले,जग्गनाथ गुरनुले,कुनाल गुरनुले,आशिष नागोसे, माणिक गेडाम,अमोल गुरनुले आणि माळी समाज व जोशाबा युवा संगटना मिनघरी येथील सर्व सभासद, श्री. गुरुदेव सेवा मंडळ येथील सभासद यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने