Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विरुर स्टेशन येथे वन्यजीव सप्ताह जनजागृती कार्यक्रम संपन्न.

वन्यजीव संरक्षण काळाची गरज- श्री. देवराव पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, विरुर स्टेशन


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरूर स्टे:- दि. ७ ऑक्टो. रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह निमित्त रॅली काढून आपआपल्या उपक्षेत्रात उपक्रम साजरा करण्यात आला.


    त्याप्रसंगी अंतरगाव बिट जि. प. प्राथमिक शाळा सुबई येथे विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताह संदर्भात जनजागृतीचे  मार्गदर्शन करण्यात आले.
   अंतरगाव-राऊंड, अंतरगाव-बिट- सुब्बई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुब्बई अशा ठिकाणी वन्यजीव सप्ताह रॅलीच्या माध्यमातून गावा-गावात वनकर्मचारी, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे मार्गदर्शन करून महत्व पटवून दिले. 


   काही गावातील लोकांना गॅस वाटप करण्यात आले. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, गोरे साहेब, गोविंदवार साहेब, राठोड साहेब, मस्ताने साहेब, कमलापुरकर साहेब, रायपूरे साहेब, प्रियंका मॅडम, तसेच अनेक विद्यार्थी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत