Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, आमची तयारी पूर्ण!; मुनगंटीवारांच्या 'गौप्यस्फोटाने' खळबळ

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिकेत सत्तेचा पेच आता टोकाला पोहोचला आहे! 'गड' जिंकूनही काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध' सुरू असल्याने, भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १० फेब्रुवारीला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडीपूर्वी चंद्रपूरचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.
दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर वडेट्टीवार आणि धानोरकर गटाने आपल्या मागण्या मांडल्या. काँग्रेसने 'डॅमेज कंट्रोल' म्हणून महापौरपद धानोरकर गटाला आणि उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला देण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे. पण, तरीही दोन्ही गटांतील धुसफूस थांबलेली नाही. याच धामधुमीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मुनगंटीवार म्हणतात, "चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसणार, आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे!" भाजपने संगीता खांडेकर यांना रिंगणात उतरवले असून, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


सर्वात धक्कादायक चर्चा म्हणजे, भाजपने चक्क ठाकरे गटाला (शिवसेना UBT) महापौरपदाची ऑफर दिल्याचे वृत्त आहे! काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय आणि त्यांच्यातील बंडखोर नेत्यांच्या जोरावर भाजप सत्ता काबीज करण्याच्या तयारीत आहे.