Chandrapur News: चंद्रपूर काँग्रेसच्या गट नोंदणी वाद उच्च न्यायालयात; भाजपकडून उमेदवारही घोषित

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाणार आहे यासाठी आरक्षण सोडत देखील पार पडले मात्र चंद्रपूरमध्ये काँग्रेस मधील धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार गटातील महापालिकेतील सत्ता संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. हे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयात गेलं आहे


नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण 66 जागांसाठी मतदान पार पडलं. त्यामध्ये काँग्रेसला 27, काँग्रेस प्रणित जनविकास सेनेला 3, भाजप 23, शिवसेना ठाकरे गट 6, वंचित 2, बसपा 1, शिवसेना शिंदे गट 1, अपक्ष 2, एमआयएम 1. अशा जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालं आहे.


यानंतर मात्र ट्विस्ट आला तो चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार या गटातील संघर्ष व अद्यापही या ठिकाणी काँग्रेस पक्षाची गट नोंदणी झालेली नाही. त्याचबरोबर दहा फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवड देखील केली जाणार आहे. त्यासाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असतानाही वाद शमलेला नाही. या वादावर काँग्रेस हाय कमांडने देखील दोन्ही गटांना आपसातील वाद मिटवून गट नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर देखील हा वाद मिटलेला नाही.तर दुसरीकडे भाजपकडून महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.


दरम्यान या प्रकरणी गट नोंदणीमध्ये त्रुटी असल्याचे दाखवत विजय वडेट्टीवार गटाकडून विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपीठांमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर खंडपीठ सुनावणी करणार का? हा तोडगा सुटून आज असलेला द्वारे महापौर पदाचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या दिवशी तरी काँग्रेसचा हा तिढा सुटून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.