आयटीआय परिसरात आढळले मृत अर्भक #chandrapur #warora

संग्रहित छायाचित्र
वरोरा:- वरोरा बसस्थानकनजीक आयटीआय परिसरातील कचऱ्यात आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चार महिन्यांचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. वरोरा पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन नकोशीच्या माता-पित्याचा तपास सुरू केला आहे. शहरातील बसस्थानकाच्या सुरक्षा भिंतीजवळ शासकीय आयटीआय परिसरात सुरक्षारक्षक गस्त घालत असताना कचऱ्यात अर्भक आढळून आले याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती स्त्री जातीची असून सहा महिन्यांची असावी, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, येथील उपजिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक लॅब नसल्यामुळे पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती ठाणेदार अमोल काचोरे यांनी दिली.

मृत स्त्री अर्भक तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याबाबतचा अहवाल यथावकाश येईलच. मात्र, नकोशीचे माता-पिता कोण आहेत. याचा शोध सुरू करण्यात आला. त्यादृष्टीने पोलिसांचे पथक कामाला लागले आहेत.
अमोल काचोरे, ठाणेदार वरोरा


https://youtube.com/@Adharnewsnetwork?feature=share7


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत