Top News

ग्रामपंचायत सदस्याची विष प्राशन करून आत्महत्या #chandrapur #gondpipari

गोंडपिपरी:- गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत भंगाराम तळोधी ग्रामपंचायतीचे सदस्य परशुराम कुकुडकर यांनी मंगळवारी (दि. ५) दुपारी दोन वाजेच्या दरम्यान स्वतःच्याच घरी विष प्राशन केले. बुधवारी (दि. ६) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ग्रामपंचायतीचे सदस्य परशुराम कुकुडकर हे मंगळवारी भंगाराम तळोधी येथील आपल्या घरीच होते. कुटुंबीयांची नजर चुकून त्यांनी विष प्राशन केले. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने