Chandrapur News: खिशातून पैसे काढल्याच्या वादातून रक्ताचा सडा

Bhairav Diwase
दोन सख्ख्या भावांच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या!
मुल:- खिशातून पैसे काढल्याच्या कारणावरून आरोपींनी दोन सख्ख्या भावांच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडून गंभीर जखमी केल्याची घटना भेजगाव येथील न्यू बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी दि. १८ डिसेंबरला दुपारी ४ वाजता घडली. आकाश अनिल तेल्लावार (३०), अनिकेत अनिल तेल्लावार (२७, रा. भेजगाव) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष हरिदास लेनगुरे (२५), मनोज नामदेव लेनगुरे (३२) यांना ताब्यात घेतले आहे.


आकाश व अनिकेत तेल्लावार, आरोपी सुभाष लेनगुरे आणि मनोज लेनगुरे हे चौघे न्यू बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये अनिकेत दुपारी दारू पित होते. तेल्लावारने मनोजच्या खिशातून दहा हजारांची बंडल काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनोज व अनिकेतमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होताच आरोपी मनोज व सुभाषने दोन्ही भावांच्या डोक्यावरच बिअरची बॉटल फोडली.


यात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही माहिती पोलिस पाटलाने ठाण्यात सांगितल्यानंतर पथक दाखल झाले. जखमींना चंद्रपुरात हलविण्यात आले.