वेकोलीमधे वाहतूक नियमांचे उल्लघन करण्याऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करा:- मनसे विधी जिल्हाध्यक्ष अँड. मंजू लेडांगे

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर वेकोलीमधे गौरव कन्स्ट्रक्शन कंपनीने आपल्या वाहन रचनेत बेकायदेशीररित्या बदल करून वाहतूक नियमांचे अल्लघन करीत आहे,त्यामुळे सदर कंत्रादारावर कायदेशीर कडक कार्यवाही करावी अशी मागणी मनसे जनहित व विधी कक्षाच्या जिल्हाध्यक्ष अँड.मंजू लेडांगे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी,चंद्रपूर यांच्याकडे निवेनाद्वारे केली आहे.
 
     दुर्गापूर वेकोलीमधे गौरव कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जवळपास २० हायवा ट्रक चालतात,सर्व ट्रकच्या  समोरील भागावर मोठा लोखंडी गार्ड बसविला आहे,जर त्या ट्रकचा अपघात दुसऱ्या वाहनासोबत झाल्यास समोरील वाहनातील व्यक्ती मृत पावण्याची दाट शक्यता आहे,त्यामुळे सदर कंपनीने वाहतूक नियमांबरोबरच वाहनाचे संरचना बदलण्याचे सुधा उल्लघन केलेले आहे,त्यामुळे वेकोली परिसरात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या कामाला सुधा धोका होऊ शकतो,त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर मोटार वाहन अधिनियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी मनसे जनहित व विधी कक्षाच्या जिल्हाध्यक्ष अँड.मंजू लेडांगे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे केलेली आहे.