शहराला विकासापेक्षा मद्या ची गरज #chandrapur #Korpana #Gadchandur


आणखी एक देशी दारू दुकान ना-हरकत साठी चर्चेतकोरपना:- गडचांदूरात पुन्हा एक नवीन स्थलांतरित दारू दुकानाचे लवकरच आगमन होणार असल्याचे कळते.यामुळे मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून दारू दुकानासाठी 'शिंदे' तर्फे ना-हरकतची मागणी नगरपरिषदकडे करण्यात आली आहे.अगोदरच गडचांदूर शहरात दारूची दुकाने भरपूर आहे.यालाही जर नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी ना-हरकत दिले तर भविष्यात गडचांदूरात दुधापेक्षा दारूची दुकानेच जास्त दिसतील. एकामागे एक येणाऱ्या दारूच्या दुकानांमुळे शहरातील शांततेला गालबोट लागण्याची भीती व्यक्त करत "यांना यासाठीच निवडून दिले का ?" असा निर्वाणीचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. येत्या 15 मार्च रोजी नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले असून विषय सूचित कधी न घेतलेले तब्बत 29 विषय यावेळी ठेवले आहे. आधीच्याच उद्घाटन करण्यात आलेले कामे पूर्ण होताना नाही फक्त एक च विषय महत्वाचा मानला जात असून यातील 26 क्रमांकाचा विषय म्हणजे, "अर्जदार श्री.प्रभाकर गंगाराम शिंदे,सुचिता प्रभाकर शिंदे तर्फे श्री.सुमित रा.विश्वास राहणार वरोरा नुसार गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील मो.वाजीद मो.शम्मी यांच्या मालकीचे जागेत माणिकगड रोड येथील मालमत्ता प्लॉट क्रमांक 9 मध्ये अनुज्ञाप्ती क्रमांक 60 देशी दारूचे दुकान लावण्यास ना-हरकत प्रदान करण्याबाबत,विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबत." हा आहे .


या पुर्वीही त्याच परिसरात एका स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्याचा प्रयत्न झाला.विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहेसह इतर विरोधी नगरसेवकांनी जोरदार विरोध केला होता.सोबतच सुरेंद्र कोमावार यांनीही निवेदनाद्वारे तिव्र विरोध दर्शवून यामगचे कारण पुढे केले होते.ज्याठिकाणी दारू दुकानासाठी ना-हरकतची मागणी करण्यात आली त्याठिकाणी आजुबाजुला निवासी क्षेत्र आहे,मुले शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातात,नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती आहे,महिलांना विवीध कामानिमित्त ये-जा करावी लागते,सदर ठिकाण अत्यंत वर्दळीचा असल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुख्य म्हणजे याच्या अगदी समोर गरीब व निराधार मुला,मुलींचे शासन मान्य वसतीगृह आहे,यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो.एकुणच याठिकाणी दारूची दुकान सुरू झाली तर अनेकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागणार आहे हे मात्र नक्की.

गडचांदूर शहराची दुसरी सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये पार पाडली.त्यामध्ये जनतेने मोठ्या विश्वासाने नगराध्यक्षांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.शहराचे कुठेतरी विकास होईल,शहराला एक वेगळी ओळख मिळेल,अशी आशा गडचांदूरकरांना होती.मात्र सध्याची परिस्थिती पाहता शहरात अनेक विकासात्मक कामे मंजूर असून अडीच ते तीन वर्षापासून कामे अद्यापही अर्धवट स्थितीत आहे.कामाचा दर्जा पाहिलाच तर अतिशय निकृष्ठ,काही कामांचे तर उद्घाटन होऊन 3 वर्ष लोटले,तरीही कामांना सुरूवात काही झालेली नाही.याबाबींकडे कानाडोळा करून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे.वास्तविक पाहता वेळेत कामपुर्ण न करणार्‍या ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल करून नगरपरिषदेला लाभ मिळवून देण्याची गरज आहे.परंतु,यांनी स्वतःच्या लाभाकडेच जास्त लक्ष केंद्रित केले आहे,असे आरोप नागरिकांकडून होत आहे.एकीकडे जनता विवीध विकास कामे व नगरपरिषदेच्या कारभारामुळे शिमगा घालत असताना दुसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांनी जणू स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्याच सपाच लावलेला दिसतोय. "कोणीही विरोध करणार नाही.5 लाख मिळणार आहे" अशी गरमागरम,टिकात्मक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू असून आता यात खरे काय आणि खोटे काय,हा सध्या संशोधनाचा विषय ठरला आहे.या पार्श्वभूमीवर येत्या 15 मार्च रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत दारूच्या विषयावर विरोधी पक्ष नगरसेवकांची भुमिका लक्षवेधी ठरणार असून संबंधित दारू दुकानाला नगरपरिषद ना-हरकत देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत