Top News

विद्यार्थ्यांचे प्राथामिक आरोग्य तपासणी आणि हत्तीरोगावर औषधांचे वाटप शिबीर #chandrapur #pombhurna


जनजागृती सशक्त बालक अभियानांतर्गत

पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथील महिला समूह, अंतर्गत तकार निवारण समिती, महिला अध्ययन सेवा केंद्र, आय.क्यु.ए.सी. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी व हत्तीरोगावर गोळयांचे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले.


शिबीरामध्ये डॉ. मेधा कुळकर्णी अध्यक्षा महिला समूह यांनी प्रास्ताविकेमध्ये शिबीराचा उद्देश स्पष्ट केला आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी आणि औषधाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच डॉ. वर्षा खोब्रागडे मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. नंतर आशा वर्कर सौ. अर्चना उराडे आणि सौ. पूजा गोरंतवार ह्यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हत्तीरोगावर गोळ्या दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, पोंभूर्णा येथील कु. सविता पोपटे, चित्तरंजन बावणकर, गौरव पेंदोर, राजेश चांदेकर यांचे योग्य सहकार्य शिबीरा दरम्यान लाभले.

चिंतामणी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथील 50 विद्यार्थ्यांनी शिबीराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी दरम्यान काही विद्यार्थी सिकलसेल ग्रस्त खोकलाग्रस्त तसेच डोळयांचे आजार असणारे आढळून आले. डॉ. वर्षा खोब्रागडे ह्यांनी त्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणी करण्याचा सल्ला दिला. तसेच व्हिटामीन व कॅल्शीयमच्या गोळया घेण्यास सांगितले. महिला समूह सभासद प्रा. सरोज यादव, श्रीमती इश्वरी उराडे प्रा. डॉ. वैशाली मुरकूटे, प्रा. डॉ. सुप्रिया वाघमारे, प्रा. वर्षा शेवटे आणि प्रा. बावणे मॅडम, सौ. सीताताई कस्तुरे यांच्या सहयोगाने कार्यक्रम सफल झाला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने