Chandrapur News : भाजप उमेदवाराचे बॅनर फाडले, तर कुठे फेकले शेण!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागांतील उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून शहरात ठिकठिकाणी मोठमोठे होल्डिंग्स झळकत आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक १ (तुकूम परिसर) मध्ये प्रचाराला गालबोट लागणारी घटना घडली आहे.

महेश नगर भागात भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांचे प्रचार बॅनर लावण्यात आले होते. अज्ञातांनी या बॅनरवर शेण फेकून विटंबना केली. तसेच, जवळच असलेल्या श्रद्धा नगर भागातही भाजप उमेदवारांचे बॅनर फाडलेले आढळले.