Chandrapur News: चंद्रपूरात कायमस्वरूपी घरपट्टे वाटपाची प्रक्रिया वेगात

Bhairav Diwase
नागरिकांकडून चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे उत्स्फूर्त स्वागत


चंद्रपूर:- घरपट्टे मिळालेल्या नागरिकांकडून मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चंद्रपूर शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, अनेक लाभार्थी नागरिकांना पट्टे वितरण करण्यात आले आहे. घुटकाळा येथे पट्टे प्राप्त झालेल्या नागरिकांनी महसूल मंत्री मा. श्री. बावनकुळे साहेबांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना बावनकुळे साहेब म्हणाले की, ही फक्त सुरुवात असून चंद्रपूर शहरातील एकूण १६ हजार नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना स्थैर्य, मालकी हक्क आणि सुरक्षित आयुष्याचा विश्वास प्राप्त होणार आहे.