चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील गौतम नगर भागात ५ जानेवारीला २७ वर्षीय विवाहित महिलेला पतीने जिवंत जाळल्याची घटना घडली होती, सदर महिलेला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान ७ जानेवारीला त्या महिलेचा मृत्यू झाला. चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीला अटक केली.
शहरातील गौतमनगर भागात २७ वर्षीय दिक्षा शुभम भडके हि महिला आपल्या आजी सोबत राहत होती, दिक्षा व तिचा पती शुभम भडके यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने ते वेगळे राहत होते, ५ वर्षाची मुलगी त्रिशा हि वडिलांकडे राहत होती. दीक्षा व शुभमचे लग्न ५ वर्षांपूर्वी झाले होते, मात्र मागील ७ महिन्यापासून पती-पत्नीमध्ये वाद व्हायला लागल्याने दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. दिक्षा हि आपल्या आजीसह गौतमनगर येथे राहत होती. ५ जानेवारीला दिक्षा ची आजी आपल्या बहिणीकडे गेली होती. रात्री ९ वाजता दिक्षाची आजी घरी पोहोचली असता घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.
त्यावेळी दीक्षा ने घरातून मला वाचवा मला वाचवा असा आरडाओरडा करीत होती, तितक्यात परिसरातील नागरिकांनी घराचे दार तोडत आत प्रवेश केला असता दिक्षा हि गंभीर जळलेल्या अवस्थेत होती, तिच्या अंगावरील कपडे व केस जळाले होते. नागरिकांनी दिक्षा ला जळालेल्या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते.
७ जानेवारीला दिक्षा चा उपचारादरम्यान मृत्यू झाला, माझ्या नातीला मारणारा दिक्षा चा पती शुभम भडके आहे असा आरोप कमला भडके यांनी केला, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे शुभम भडके ला अटक करीत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. दिक्षा च्या आजीने सांगितले कि शुभम हा अधूनमधून घरी येत होता, त्याला दारूचे व्यसन होते त्यांनी मला व माझ्या नातीला दारू पिऊन मारहाण सुद्धा केली होती. ५ जानेवारीला दिक्षा ला घरी एकटी असल्याची संधी साधत त्याने तिला जाळून ठार मारले.
याबाबत पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके म्हणाले कि या गुन्ह्यात आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे, पती-पत्नी मधील वादातून हि घटना घडली असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

