Top News

स्टुडंट्स युनिट ऑफ मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाचे उद्घाटन #chandrapur



पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे "स्टूडंटस युनिट ऑफ मायकोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडीया चे रीतसर उद्घाटन करण्यात आले.


याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. वेगीनवार, उप प्राचार्य डॉ. हुंगे, आय.क्यु.ए.सी. कोऑरडीनेटर डॉ. अनंत देशपांडे, कव्हेनर डॉ. मेघा कुलकर्णी, प्रा. अमोल गर्गेलवार को कन्वेनर स्टूडंट्स युनीट ऑफ एम.एस.आय. सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा तसेच प्रा. डॉ. एस.एस. बनकर, गोंडवाना विद्यापीठ कोऑर्डीनेटर एम.एस.आय आणि विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग जनता महाविद्यालय हे ऑनलाइन उपस्थित होत्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. अविनाश चकीनारपुवार, विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड सायन्स, गोडपिपरी उपस्थित होते.

दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली गोंडवाना गीतानंतर विद्यार्थ्यांनी सुक्ष्मजीवांवर कविता सादर केली. प्रास्ताविक प्रा. श्री. अमोल गर्गेलवार हयांनी केले तर स्टूडटस् युनिट 2022-23 ची सभासद समिती डॉ. मेघा कुळकर्णी यांनी जाहीर केली. तसेच स्टुडंटस् युनिट चे जाहीर उद्घाटन डॉ. बेगीनवार सर आणि प्रा. चकीनारपुवार सर यांनी केले. सर्व सभासदांना पुष्पगुच्छ व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.

स्टुडेंट्स युनिट च्या सभासदांनी सुक्ष्मजीवशास्त्र विषयाचा प्रसार म्हणून उपस्थितांसाठी रोगवाढविणारे सुक्ष्मजीव रोगाचे लक्षण आणि औषधोपचार व लसीकरण यावर लघुनाटिका सादर केली. प्रा. चकीनारपुवार सरांनी विद्यार्थ्यांना सुक्ष्मजीवशास्त्र विषयाचा प्रचार व प्रसार यावर गेस्ट लेक्चर दिले आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. डॉ. हुंगे सर, तसेच डॉ. देशपांडे सर यांनी विज्ञानाचे महत्व समजावितांना अनेक उदाहरण दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. वैगीनवार सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये सुक्ष्मजीवशास्त्र विषय किती महत्वपूर्ण आहे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचानल कु अवंती मानकर आणि कु. श्रद्धा राजुरकर यानी उत्कृष्टरीत्या केले. तसेच आभार प्रदर्शन कु. यास्मिन खान पठान हिने केले सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमातून कार्यक्रम सफल झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने