Top News

नारंडा येथील तलाव खोलिकरणाला सुरवात #korpana


सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते शुभारंभ

तलाव खोलिकरणामुळे भूजल पातळी वाढणार,परिसरातील शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना फायदा होणार


कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे तलावाच्या खोलिकरणाला सुरवात झाली असून ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अनुताई ताजने यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.सदर तलावाच्या खोलिकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तर्फे करण्यात येत आहे.


राजुरा-गदचांदुर- कोरपना- गोविंदपूर हा राष्ट्रिय राजमार्ग देशाचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून होत आहे, महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या २०१७ च्या शासन निर्णयानुसार सदर रस्त्याच्या कामाला लागणारा मुरूम हा


 परिसरातील तलाव,नाला यातून वापरण्यात येत आहे,त्यामुळे राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक गावातील नाले,तलाव खोलीकरण करण्यात येत आहे,त्यामुळे पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सिंचानाकरिता फायदा होणार असून,गावातील नागरिकांना सुधा पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


यावेळी सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,जीआर इनफ्रा कंपनीचे डॉ. अँड.पूनम कुमार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,उपसरपंच बाळा पावडे,माजी सरपंच वसंता ताजने,सुरेश पाटील परसुटकर,अनिल मालेकर,अनिल शेंडे,भिकाजी घुगुल,बाळा गाडगे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने