Chandrapur News: ईश्वरचिठ्ठीने ठरला स्थायी सभापती! मनस्वी गिऱ्हे विजयी

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत आज स्थायी सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या मनस्वी गिऱ्हे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे स्थायी सभापतीपदी निवड झाली.

स्थायी सभापती पदासाठी भाजप-शिवसेना ठाकरे युतीकडून मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंता देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणुकीवेळी दोन्ही बाजूंकडे समान ८-८ असे संख्याबळ असल्याने निकाल अनिश्चित झाला. त्यामुळे अखेर ईश्वरचिठ्ठीचा पर्याय अवलंबण्यात आला. या प्रक्रियेत मनस्वी गिऱ्हे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची स्थायी सभापतीपदी निवड झाली.