सुधीर मुनगंटीवार उच्च शिक्षीत उमेदवार यांच्या कार्यकतृत्वाची फलश्रुती! #Chandrapur #chandrapurloksabha

चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये एकंदर तिन महिला व बारा पुरूष असे पंधरा उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. यामध्ये एम.फिल, बी.जे., एलएलबी, डीबीएम, एम.कॉम, बी. कॉम, उच्च शिक्षीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा सुरेश धानोरकर ह्या बि.ए. प्रथम वर्ष (नापास), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या उमेदवार पुर्णिमा दिलीप घोनमोडे, एम.ए. पिचडी, अखिल भारतीय मानवता पक्ष चे उमेदवार वनिता जितेंद्र राऊत, बारावी, जय विदर्भ पार्टी चे अशोक राठोड बि.एस.सी. (बायो.), जनसेवा गोंडवाना पार्टी चे उमेदवार अवचित शामराव सयाम बि.ए., वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश वारलुजी बेले दहावी, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे उमेदवार माणिकराव शेडमाके, बारावी नापास (आयटीआय), बहुजन समाज पक्षाचे उमेदवार राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके, पदविका, तर अपक्ष उमेदवार संजय गावंडे, एस.एस.सी, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) उमेदवार सेवकदास बरके, बि.ए. नापास, आयटीआय, आंबेडकर राईट ऑफ इंडियाचे उमेदवार दिवाकर हरिजी उराडे, हे सहाय्यक अधिव्याख्याता असुन त्यांनी एम.ए. (समाजशास्त्र, राज्यशास्त्र), पिएचडी, भीमसेना पक्षाचे कालिदास लक्ष्मीनारायण कासर्लावार, दहावी पास, मिलींद दहिवले, बारावी सन्मान राजकीय पक्षाचे विकास लसंते, दहावी आहेत.

मुनगंटीवार यांच्या कार्यकतृत्वाची फलश्रुती!


गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ सुधीरभाऊंनीच आणले. नागपूर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे सार्थ नामकरण त्यांच्याच प्रयत्नामुळे झाले. उल्लेखनिय बाब अशी कि श्री गुरूदेव भक्तांनी गुरुकुंज मोझरी येथील ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू आणि ईतर अन्य राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली. त्या पीठावर सुधीर मुनगंटीवार यांना बसवून सन्मानित केले. अंधजनांच्यासाठी केलेले महत्वपूर्ण कार्य यामुळे पुणे भागात झालेला त्यांचा सत्कार, विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या तीन घटना सुधीर मुनगंटीवार यांचा सर्वात मोठा सन्मान आहे.


चक्क महाविद्यालयाला मुनगंटीवार यांच्या नाव!


चौदा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार महाविद्यालय हे नाव घेऊन गावकऱ्यांनी सुधीर भाऊ च्या खऱ्या अर्थाने कार्यकर्तृत्वाचा सत्कार सन्मान केला आहे. चंद्रपूर पासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आणि आठवे ज्योर्तिलिंग म्हणून प्रसिद्ध असलेले औंढा नागनाथ या गावातील एका महाविद्यालयाला चक्क सुधीर मुनगंटीवार यांचे नाव देण्यात आले आहे. या महाविद्यालयात पहिली ते बारावी पर्यतचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मग जिल्ह्यापासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेला मुनगंटीवार यांचेच नाव कां असा प्रश्न सहाजिकच उद्भवतो. सुधीरभाऊंनी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या गावाला विकासासाठी शासकीय निधीतून विकास निधी दिला होता. त्या विकास निधीतून औंढा या गावांमध्ये पहिली ते बारावी पर्यत ज्ञानदानासाठी एक महाविद्यालय बनविण्यात आले, त्या महाविद्यालयात आज ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असून औंढा नागनाथ गाववासियांनी चक्क या महाविद्यालयाला सुधीर मुनगंटीवार महाविद्यालय असे नाव देऊन मुनगंटीवार यांचे मानलेले आभार हे संतांनी सांगितलेल्या वाणीप्रमाणे आहे, 'कुकर्म करणारी, नितीमत्ता सोडलेली माणसं वरपाणी कितीही ऐशोआरामात जगतांना दिसली तरी ही तुम्ही आपली विचारधारा बदलु नका. जे पेरालं तेच उगवणार, त्यामुळे आपल्या कमीशी प्रामाणिक रहा. कारण कर्म जेंव्हा वसुलीवर येते तेंव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. जे पेराल तेचं उगवेल.' मुनगंटीवारांनी शासकीय विकासासाठी दिलेल्या निधीतून ज्ञानादानासाठी बनविलेल्या महाविद्यालयाचे नांव सुधीरभाऊ मुनगंटीवार महाविद्यालय असे नांव देऊन मानलेले आभार ही फार मोठी पावती आहे.


 #Sudhir Mungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote   #Sudhir Mungantiwarvspratibha dhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde  #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #N #maharashtrapolitics #rainupdate

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या