Chandrapur Collector : चंद्रपूरला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; वसूमना पंत यांची नियुक्ती

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा फेरबदल करण्यात आला असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता नव्या जिल्हाधिकारी म्हणून वसूमना पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वसूमना पंत या २०१७ च्या बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, त्या सध्या नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. वसूमना पंत आता चंद्रपूर जिल्ह्याचा गाडा हाकणार आहेत.