Nagbheed Police: हनुमान टेकडीवरील जुगार अड्ड्यावर छापा, ६ जण अटकेत!

Bhairav Diwase
नागभीड:- नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कान्पा येथील हनुमान मंदिर परिसरात उघडपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मारलेल्या या छाप्यात पोलिसांनी ६ जणांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून वाहने, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ३,७७,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


रंगेहात पकडलेले ६ जण:

१) दीपक गंगाधर करुटकर (वय ३७, रा. कान्पा, ता. नागभीड)
२) लक्ष्मण नेमाजी गोंगल (वय ३५, रा. पांजरेपार, ता. चिमूर)
३) जगदीश दादाजी भुरसे (वय ४९, रा. कान्पा, ता. नागभीड)
४) सुधाकर पांडुरंग मुळे (वय ४७, रा. पांजरेपार, ता. चिमूर)
५) दामोदर वासुदेव घ्यार (वय ६६, रा. आजगाव, ता. चिमूर)
६) नितेश बाळकृष्ण मलोडे (वय ३०, व्यवसाय: चालक, रा. कान्पा, ता. नागभीड)


जप्त केलेला मुद्देमाल:

रोख रक्कम: डावावरील ९०० रुपये व आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले ६,०१० रुपये (एकूण ६,९१० रुपये).

मोबाईल: ६ मोबाईल हँडसेट (किंमत रु. ४१,०००/-).
 

वाहने: ५ जुन्या वापरत्या सायकली/मोटारसायकली (किंमत रु. ३,३०,०००/-).

इतर: ५२ पत्त्यांचे कॅट.

एकूण ३,७७,९१० रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस पथकाची कामगिरी:

सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) श्री. साहील झरकर आणि नागभीडचे पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोउपनि अनिल डोंगरवार, पोहवा दिलीप चौधरी (बॅज क्र. १९७१), पोअं जितेंद्र मारबते (बॅज क्र. २३४) आणि पोअं शुभम वनकर (बॅज क्र. १७९६) यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.