चंद्रपूर:- पवित्र नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला कलंक लावणारी एक अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी बातमी चंद्रपूर शहरातून समोर आली आहे. ज्या पित्याने पाठीवर मायेचा हात फिरवून सांभाळ करायचा, त्याच नराधम बापाने स्वतःच्या १९ वर्षांच्या मुलीवर वाईट नजर ठेवून तब्बल ५ वर्षांपासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. अखेर नराधमाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने हिंमत दाखवत रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. आरोपी पिता मुंबईमध्ये एका कंपनीत वाहन चालक म्हणून काम करतो. दर ४ ते ५ महिन्यांनी सुट्टीवर घरी आल्यावर तो मुलीशी अश्लील चाळे करणे, अंगाला स्पर्श करणे आणि अश्लील व्हिडिओ दाखवणे असे संतापजनक प्रकार करत असे. या कृत्याला विरोध केल्यास मुलगी आणि तिच्या आईला घराबाहेर काढून देण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी आरोपी देत होता. नुकत्याच जुलै महिन्यात सुट्टीवर आल्यानंतर या नराधमाचे अत्याचार आणखी वाढले. २४ जुलै रोजी पीडित मुलीच्या वाढदिवशीच रात्री झोपेत असताना त्याने मुलीशी अत्यंत लज्जास्पद चाळे केले आणि १७ जुलै रोजी तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी वडिलांविरोधात BNS च्या विविध गंभीर कलमांसह POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे. ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात API अश्विनी वाकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Chandrapur News : चंद्रपुरात पवित्र नात्याला काळिमा
गुरुवार, ऑगस्ट २०, २०२६
५ वर्षांपासून बापाचा लेकीवर अत्याचार!
