स्पोर्ट्स बाईकने ते दोघे सुसाट सुटले; वळणावर बसला थेट भिडले #chandrapur #accident

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- शहरातील नागपूर मार्ग आता अपघाताचे कारण ठरत आहे.  सकाळी झालेल्या एका अपघातात स्पोर्ट्स बाईक स्वार युवकांनी वळण घेत असलेल्या बसला थेट धडक दिली.

स्थानिक विश्रामगृहासमोर झालेल्या या अपघातात चंद्रपूरकर रहिवासी असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस शहराकडे वळसा घेत होती. मात्र अतिवेगात असलेल्या बाईक स्वरांनी नियंत्रण गमावले आणि हा अपघात झाला. या भागात असलेल्या रहिवाशांनी तातडीने जखमी युवकांना मदत केली. या दोन्ही युवकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर नागपूर मार्गाचा हा भाग मजबुतीकरण व सौंदर्यीकरण केल्यानंतर रुंद झाला आहे. यामुळे या रस्त्यावर भरधाव वेगात बाईक चालवण्याची जणू स्पर्धाच असते. अतिवेगाच्या नादात हा अपघात झाला. रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)