4 गाळ्यांना मनपाने ठोकले टाळे #chandrapurचंद्रपूर:- मोठी थकबाकी असणार्‍या 4 गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने इंडस्ट्रीयल वॉर्ड येथील वुडन इंडस्ट्रीज, शास्त्रीनगर येथील शर्मल महातव, शास्त्रीनगर गृह निर्माण संस्था येथील अजय जयस्वाल व राजेश लाडे यांचे गाळे सील करण्यात आले. या 4 गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणार्‍या आणि टाळाटाळ करणार्‍या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. कर विभागातर्फे अनेक गाळ्यांवर कारवाई प्रस्तावित होती. जप्ती पथक जाताच यातील अनेक गाळेधारकांनी कराचा पुर्ण भरणा केला. मात्र, 4 गाळेधारकांनी कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने ही कारवाई केली आहे.

यात शर्मल महातव थकबाकी 63,381, वुडन इंडस्ट्रीज थकबाकी 21068, शास्त्रीनगर गृह निर्माण संस्था येथील अजय जयस्वाल थकबाकी 15456, राजेश लाडे थकबाकी 27212 असे एकुण 4 गाळे सील करण्यात आले. तसेच येथील स्टार बेकरी थकबाकी 2,30,796, आनंद लॉटरी सेंटर 25000, नाईद हुसेन 1,04094, इन्स्पायर अकेडमी 2,39,052, गुलाब लहामगे 1,42,294, हसन इलेकट्रीकल्स 96,404, विनोद कावळे 91,103, गुरुदेव लॉन यांच्याकडे 6,02064 रुपयांची थकबाकी होती. वसुली पथक जाताच सर्वांनी कराचा पुर्ण भरणा केला आहे. ही कारवाई 3 मार्च रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धेत, कर विभाग प्रमुख अनिल घुले, अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे, मार्केट लिपिक प्रविण हजारे, मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अतिक्रमण विभाग कर्मचारी पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत