Top News

पत्रकार मुबारक शेख यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित #chandrapurचंद्रपूर:- श्री. कालिका देवी मंदीर संस्थान व क्रीडा संस्कृती फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी पत्रकार मुबारक शेख यांची निवड करण्यात आली. दि. ५ जानेवारी २०२३ रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

💟

या कार्यक्रमाला पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजन समिती अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव आनंद खरे, क्रीडा संस्कृती फाउंडेशन सचिव उदय खरे, खजिनदार दीपक निकम, आदींसह राज्यभरातून आलेले सन्मान मूर्ती पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने