महाकाली मंदिरातील प्रकार पोलिसांची मॉक ड्रील #chandrapurचंद्रपूर:- आज सकाळच्या सुमारास महाकाली मंदिरात बॉम्ब असल्याची माहिती पसरली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीचे काही नागरिकांनी चित्रीकरण करत सोशल माध्यमांवर टाकले. मात्र हा सर्व प्रकार पोलिसांचा मॉक ड्रीलचा म्हणजेच नियमित सरावाचा भाग असुन असा कुठलाही प्रकार घडलेला नाही.

सकाळच्या सुमारास पोलिसांनी चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिरात यशस्वी सराव केला आहे. महाकाली मंदिरात बॉम्ब असल्याचे बनावटी नाट्य करत काही मिनीटात त्यांनी हा पुर्वनियोजित बॉम्ब शोधत नाट्यक्रमाचा भाग असलेल्या तिघांना ताब्यात घेत यशस्वी सराव पार पाडला आहे.


मॉक ड्रिल म्हणजे काय?

आग लागल्यास किंवा भूकंप झाल्यास किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास काय करावे यासाठी कर्मचारी जसे की अग्निशामक दलातील कर्मचारी, जनता, विद्यार्थी, पोलिस इ. ना प्रशिक्षण देण्यासाठी त्याप्रकारची खोटी परिस्थीती निर्माण केली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत