महिला गंभीर जखमी; हात व पायाला जबर मार
पोंभूर्णा:- तालुक्यातील नविन गंगापूर येथील कक्ष क्रमांक ९१ नजीक शेतशिवारात शेळ्या चराईसाठी गेलेल्या महिलेवर रानडुकरांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारला संध्याकाळी ५:३० च्या दरम्यान घडली.
कल्पना माधव मंडरे वय ५५ वर्ष नविन गंगापूर असे गंभीर जखमी महीलेचे नाव आहे. कसरगट्टा बिटातील गंगापूर नविन येथील कक्ष क्रमांक ९१ नजीक असलेल्या शेतशिवारात कल्पना मंडरे शेळ्या चारत होत्या.अचानक रानटी डुकराने तिच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.यात तिचा हात व पाय फ्रक्चर झाला.जखमी महिलेला तातडीने ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. पुढील तपास वनविभाग करीत आहेत.