चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा स्टेडियम येथे नुकत्याच झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सेंट मायकेल स्कूलची विद्यार्थिनी स्वराली अभिषेक शेंडे हिने आपल्या खेळाडु नेतृत्व गुणाची चुणूक दाखवत उत्कृष्ठ खेळ प्रदर्शन केले.
दरम्यान स्वराली ची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून ती या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
यापूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा स्टेडियम येथे शालेय कराटे स्पर्धा झाली. यात स्वरालीने बाजी मारली. यानंतर विभागीय स्पर्धेत तिने आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर समुद्रपूर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत कराटेचे कौशल्य दाखविल्याने तिची निवड करण्यात आली आहे.
आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ती आता चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व तिच्याकडे आल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी स्वरालीचे अभिनंदन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत