Accident News: वळणावर हायवा-ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर; घटना CCTV मध्ये कैद

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चुकिच्या दिशेने बांबू घेऊन जाणाऱ्या ट्रकची हायवा ट्रक ला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात हायवा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

अपघातामुळे काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. हायवा चालक विनोद जुनघरे (४२) गंभीर जखमी झाले. अपघातात ट्रकचे समोरील टायर फुटले असून दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. अपघात भद्रावती शहरातील मानोरा वळणावर झाल्यामुळे नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जवळपास दीड़ तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

जखमी चालकाला तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मानोरा वळण रस्ता हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून गेल्या महिन्याभरात येथे हा पाचवा अपघात झाला आहे. यापूर्वीच्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांन कडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.