Chandrapur News: गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात बल्लारपूर पोलिसांनी रात्री शहरातील भगतसिंग वार्ड परिसरात केलेल्या एका धाडसी कारवाईत ७.६५ मिमी बोरची देशी बनावटीची पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केलीत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली तर एक जण फरार झाला. कार्तिक उर्फ यश राकेश निषाद (वय १९) याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचा साथीदार मोनू मंजा निषाद हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

ताब्यात घेतलेल्या कार्तिकची कसून चौकशी केल्यानंतर, यावेळी घराच्या छतावर पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवलेली ७.६५ मिमी बोरची पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. जप्त केलेल्या या शस्त्रांची किंमत सुमारे २३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी कार्तिक निषाद आणि मोनू निषाद या दोघांविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहे.