विजसन फायरिंग बट येथे रंगले थरारक प्रशिक्षण
चंद्रपूर:- भद्रावती येथील विजसन फायरिंग बट येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शस्त्र हाताळणी आणि फायरिंगचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
उपसंचालक कुशग्रा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणात विविध वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक राजेश शत्रकार आणि त्यांच्या पथकाने पिस्टोल व SLR हाताळणीसह प्रत्यक्ष फायरिंगचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे वनसंरक्षण पथकाची कार्यक्षमता आणि सज्जता अधिक बळकट होणार असल्याचे सांगण्यात आले.

