Top News

जय भीम! झी युवावर उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.... #JayBhim Jai Bhima! Dr. will unfold on Zee Yuva. Biography of Babasaheb Ambedkar



दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मुलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौध्द धर्माला पुनरूज्जीवन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे.

Total 4 active Our Own Candle плюс Coupons & Promo Codes are listed and the latest one is updated on May 05, 2019 00:16:35 AM; 2 coupons and 2 deals.

विविध विषयांवरील प्रबोधनातून मनोरंजन देणाऱ्या झी युवा या वाहिनीवरून सुरू होत असलेल्या जय भीम. एका महानायकाची गाथा या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य या मालिकेतून उलगडणार आहे. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या मालिकेला सुरूवात होत असून महानायकाच्या आयुष्यातील संघर्षापासून ते त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा आलेख पाहता येणार आहे.

झी युवा वाहिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाची गाथा मालिकेच्या रूपातून मांडण्यासाठी सज्ज झाली आहे. जय भीम . एका महानायकाची गाथा ही मालिका १४ एप्रिलपासून झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे.

यामध्ये झी युवानेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग , घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे.

स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उध्दारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारीत आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामािजक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने