श्याम बोबडे यांच्या राजीनाम्याने खळबळ #chandrapur #resignation

शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या एका दिवसा आधीच राजीनामा


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील श्याम बोबडे यांची ४ वर्षांपूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. परंतु श्याम बोबडे यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या एका दिवसा आधीच सह्याद्री प्रतिष्ठान शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले राजीनाम्यात

मी मागच्या ४ वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर साठी काम करीत आहो. या कालावधी मधे आपण माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या सारख्या सर्वसाधारण सदस्याला चंद्रपूर शहर उपाध्यक्ष ते शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या साठी आपले खूप खूप आभार. परंतु आज दि. १८/०२/२०२३ रोजी माझ्या वैयक्तिक कारणामुळे या पदाचा राजीनामा देतो व आपली अनुमती घेतो. पुढे कुठेही माझी आपल्याला मदत लागल्यास मी सदैव आपल्या साठी हजर राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या