Top News

महाशिवरात्री निमित्त गोंडकालीन अंचलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी #chandrapur



चंद्रपूर:- महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लाळशा यानं आपल्या अंगावर घेतल्यानं त्याच्या अंगावरील फोडं नाहीसे झाले. तो वेदनेतून मुक्त झाला आणि त्यामुळंच इथं भव्य मंदिराची उभारणी झाली. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.


चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं पंधराव्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं.

चंद्रपूरची ऐतिहासिक व धार्मिक ओळख येथील मजबूत किल्ल्याचे परकोट, राजवाडा, महाकाली आणि अंचलेश्वर महादेव मंदिर व येथे उभ्या असलेल्या वास्तुमुळे आहे. त्यातल्या त्यात अंचलेश्वर महादेव मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. मुळात चंद्रपूर हे शहर याच धार्मिक स्थळाच्या महात्म्यामुळे वसले आणि ते पुढे विस्तारून आज महानगर झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने