"हद्द" एक मर्यादा चित्रपटाला चंद्रपूरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- हद्द " एक मर्यादा हा चित्रपट दि. १५ आक्टोंबर शनीवार रोजी स्थानिय प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाटयगृहात फक्त ३ शो मध्ये दाखविण्यात आला. त्यावेळी चंद्रपूरकरांनी जो प्रतिसाद दिला तो अवर्णनीय आहे.
सविस्तर असे कि, चंद्रपूर शहरातील हॉस्पीटल वार्ड रहिवासी देवा बुरडकर (फोटोग्राफर) आणी तुकूम निवासी प्रीतम खोब्रागडे फोटोग्राफर) या दोन मित्रांनी एस. के. बॅनर खाली "हद्द " "एक मर्यादा या शिर्षकाने चंद्रपूरातील पहिला मराठी चित्रपट तयार केला. ज्यामध्ये सबकुछ चंद्रपूरातच आहे कलावंत , निर्माता , गायक सारेच चंद्रपूर अथवा चंद्रपूर जिल्हा असेच आहे. हा चित्रपट काढण्यामागे एकच उद्देश होता वारंवार मानवी वस्तीवर वन्य प्राण्यांचे आगमनाच्या घटनेत सातत्याने वाढच होत आहे . यावर शासन व जनता यांना कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज आहे.  ती दखल समाजाने सुध्दा स्वीकारावी यासाठी चित्रपटाची निर्मीती झाली. असे देवा व प्रितमला वाटते. यात प्रजेश घडसे, प्रशांत कक्कड, प्रकाश वाघमारे संजय रामटेके, के राजू, अमित शास्त्रकार, धीरज गोगुलवार, शुभम भगत, मनोज तोकला, मनीष आंबेकर, शंकर दास, ज्योत्स्ना निमगडे, प्रदिप निमगडे, राजेंद्र वालदे, मृणाल कांबळे, अनुप वानखेडे, रमेश तांडी, गिरीश खोब्रागडे, प्रशिक  वाहने, विनोद शेंडे, आबीद शेख ,अफरोज पठाण  पाहुणा ,कलाकार प्रकाश परमार (मुक्त वृत्तछायाचित्रकार ) एका दृष्यात भाव खाऊन गेला.
चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी दिप प्रज्वलन केले. योगनृत्य संस्थापक गोपालजी  मुंधळा, सुभाष शिंदे ,डॉ. धनंजय तावाडे, शैलेश दुपारे, देवा बुरडकर, प्रीतम खोब्रागडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन होऊन राष्ट्रगीताने व वंदेमातरम घोषणांनी चित्रपट सुरु करण्यात आला.

       फक्त 3 च शो हाउसफूल्ल व तोबा गर्दी प्रमोशन पूर्वी राष्ट्रगीत, फोर व्हीलर
समोर कट आउट, लोकांच्या लाईव्ह मुलाखती .  या चित्रपटातील गीत गीतकार/ संगीतकार /  गायक युवराज गोंगले यांनी गायले असुन बाबा ये ना परत एकदा... अल्पावधीत लोकप्रिय झालं.  
   
   डॉ.धनंजय तावाडे सर ( झुम्बा ग्रुप चंद्रपूर  ) तिकीट विक्रीसाठी भरीव मदत केली . फक्त 3 च शो पैकी प्रत्येक शोला प्रत्येकी तीन लक्की ड्रॉ काढून प्रेक्षकांना निर्मात्यांनी भेट म्हणून दिल्या. या चित्रपटातील उत्स्फूर्त प्रतिसाद व जनतेचे प्रेम अर्थातच "हद्द' एक मर्यादाला चंद्रपुरकरांनी जे यश दिले
ते अमर्याद आहे सर्व चंद्रपुरकरांचे जाहिर आभार देवा व प्रितम यांनी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.