ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते जुनगावच्या चिंचोलकर महाराजांना गॅसचे वितरण संपन्न#chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते जुनगाव येथील निराधार गृहस्थ चिंचोलकर महाराज यांना गॅस व शेगडी साहित्याचे वितरण दि. १५ ऑक्टोंबर रोजी पोंभुर्णा वनविश्रागृहात पार पडले. माजी पं. स. उपसभापती विनोद देशमुख यांनी आपल्या स्वनिधीतून ही गॅस व शेगडी उपलब्ध करून दिली होती.
वितरणाप्रसंगी, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, नगराध्यक्षा सौ. सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, हरीश ढवस, नगरसेविका सौ. श्वेताताई वनकर, बंडू बुरांडे, गुरूदास पिपरे, रोशन ठेंगणे, अरूण कुत्तरमारे, नगसेविका सौ. नंदाताई कोटरंगे यांचेसह तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या